सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.३० : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर,अतर्गंत शासन निर्णय 14 आगस्ट 2018 नुसार कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतर्गंत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहीन कुटूंबाना 4 एकर कोरडवाहु किंवा 2 एकर बागायती शेतजमीन 100 % अनुदान तत्वावर उपलब्ध करून देण्यात येते

योजनेचे निकष /अटी व शर्ती

• अर्जदार हा अनुसूचित जाती/नवबौध्द घटकातील असावा.

• अर्जदार हा नागपूर जिल्हातील रहीवासी असावा.

• अर्जदार हा दारिद्र रेषेखालील/अंत्योदय शिधापत्रिका धारक असावा.

• अर्जदार भूमिहीन शेतमजुर असावा.

• अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 60 वर्षापर्यंत असावी.

• दारिद्र रेषेखालील विधवा, परित्यक्ता व घटस्फोटीत स्त्रिया यांना प्राधान्य देण्यात येते.

• अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचार ग्रस्त व्यक्ती/कुटूंब यांना प्राधान्य देण्यात येते.

• तृतीय पंथी व्यक्ती सदर योजनेचा लाभ मिळणे करीता अर्ज करू शकतो (सदर व्यक्ती बौध्द व अनुसूचित जातीची व दारिद्रयरेषेखालील किंवा अंत्योदय शिधापत्रिका धारक असणे आवश्यक)

नागपूर जिल्हातील रहीवासी असणाऱ्या व्यक्तींनी सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता सहायक आयुक्त समाज कल्याण,डॉ.बाबासाहेब आबेंडकर सामाजिक न्यायभवन,श्रघ्दानंद पेठ नागपूर येथून अर्ज प्राप्त करून घेवुन अर्ज सादर करावे असे जाहीर आवाहन सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण नागपूर हे करीत आहे.अधिक माहीतीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर येथे सपंर्क साधावा.

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More