सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत सुवर्ण पदक व राष्ट्रीय स्तरावर पियुष गोमासे याची निवड

सक्षम भारत वार्ता
नागपुर,ता.३० : महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत सुवर्ण पदक व राष्ट्रीय स्तरावर निवड हजरत बाबा ताजुद्दीन महाविद्यालयाचा विद्यार्थी पियुष गोमासे  दिनांक १८, १९, २० ऑक्टोबर २०२६ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ बॉक्सिंग (पुरुष) वर्गात आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये हजरत बाबा ताजुद्दीन कला वाणिज्य महाविद्यालय ताजाबाद शरीफ उमरेड रोड नागपूर येथील बि.ए भाग १ चा विद्यार्थी पियुष मोरेश्वर गोमासे, या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतून विद्यार्थी सहभागी झालेले होते. या स्पर्धेत हजरत बाबा ताजुद्दीन कला वाणिज्य महाविद्यालय ताजाबाद शरीफ, उमरेड रोड नागपूर येथील विद्यार्थी पियुष मोरेश्वर गोमासे या विद्यार्थ्याला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले. त्याची राष्ट्रिय स्तरावर निवड झालेली आहे. हा विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बॉक्सिंग स्पर्धेचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणार आहे. राष्ट्रिय बॉक्सिंग स्पर्धा नोएडा, नवी दिल्ली येथे होणार आहे. या विद्यार्थ्याला सुवर्ण पदक व राष्ट्रिय स्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल विद्यापीठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यासोबतच हजरत बाबा ताजुद्दीन कला वाणिज्य महाविद्यालय ताजाबाद शरीफ, उमरेड रोड नागपूर या विद्यार्थ्याचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात शादाब एज्युकेशन सोसायटी नागपूर चे अध्यक्ष अब्दुल सलीम अब्दुल जब्बार, संस्थेचे सचिव मोहम्मद शादाब अब्दुल सलीम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शकील सत्तार, डॉ. विरेंद्र आदमने, डॉ. सुभाष धोटे, डॉ. सुरेश काळे, डॉ. मिनाक्षी इंगळे, डॉ. विनोद शेंडे, डॉ. नामदेव मोरे, डॉ. समीर बडगुजर, प्रा.अर्पित थुल, प्रा. राहुल डेंगे, प्रा. अंकीत मेटांगे, प्रा. किरण हटवार, प्रा. प्रांजली हाडगे, प्रा.तनवीर खान या सर्वांनी सत्कार व अभिनंदन केले व राष्ट्रिय स्तरावर सुद्धा यश प्राप्त होवो यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More